अखेर वडसा स्टेशन वर यशवंतपुर कोरबा वैनगंगा एक्सप्रेस थांबली, खा. अशोक नेते यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केली

देसाईगंज : गडचिरोली
जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या वडसा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची व प्रवाशांची वर्दळ असताना यशवंतपूर-कोरबा या वैनगंगा एक्स्प्रेसचा थांबा सुरू झालेला नव्हता. खा.अशोक नेते यांनी याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर हा थांबा अखेर गुरूवार दि.१५ पासून सुरू झाला. यावेळी खा.नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रेल्वेगाडीला वडसा स्थानकावरून रवाना करण्यात आले.

यावेळी आमदार कृष्णा गजबे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, तालुका अध्यक्ष सुनील पारधी, तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, वसंत दोनाडकर, रेल्वे मंडळाचे अप्पर प्रबंधक टी.जगताप,

Leave a Comment